🌟पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे आज पासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात....!




🌟श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज यांच्या 61 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सप्ताह सोहळ्यात पहाटे 4ते6  काकड आरती ,6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 1 तुकाराम गाथा भजन ,1 ते 3 भावार्थ रामायण 3 ते 4 ज्ञानेश्वरी प्रवचन, 5 ते 7 हरिपाठ ,9 ते 11 हरिकीर्तन, नंतर हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत बुधवार दिनांक 6 रोजी ह .भ .प. भगवान महाराज शेंद्रेकर तर प्रवचन ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली ठाकूर बुवा यांचे प्रवचन होईल, गुरुवार 7 रोजी ह.भ.प. माधव महाराज फुलकळसकर ,तर ह.भ.प.भगवान गुरुजी ढोणे यांचे प्रवचन, शुक्रवार 8 रोजी ह.भ.प. प्रसाद महाराज गडदे ब्रम्हावाडी,तर ह.भ.प. संतराम महाराज ढोणे यांचे प्रवचन, शनिवार 9रोजी ह.भ.प.माधव महाराज काळबांडे श्रीरामपुरकर,तर ह.भ.प. दिपक गुरु महाराज पांगरेकर, रविवार 10 रोजी न्याय विधी तज्ञ ह.भ.प. यादव महाराज डाखोरे वाईकर,तर ह.भ.प.सोपान गुरुजी ढोणे, सोमवार 11रोजी ह.भ.प. गजानन गुरुजी लहानकर,तर ह.भ.प.गोपाळ गुरुजी भुसारे नावकीकर, मंगळवार 12 रोजी , ह.भ.प.बबन महाराज मुडीकर,तर ह.भ.प. हरी गुरुजी बुचाले आव्हईकर, बुधवार 13रोजी सकाळी 9 वाजता श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल  आणि महादेव मंदिर परिसरात आस्वाचा गोल रिंगण सोहळा होईल, दुपारी 2 ते 4 पुजेचे हरी किर्तन ह.भ.प. भागवत महाराज ठाकुर कावलगावकर यांचे होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होईल व राञी ह.भ.प.राम महाराज सुगाव नांदेड यांचे होईल, गुरुवार 14 रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प. नारायण महाराज टाकळीकर यांचे काल्याचे किर्तन होईल तरी या किर्तन श्रवनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पांगरा ढोणे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या