🪯श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन मध्ये आयोजित सद्भावना सम्मेलनात बोलतांना ते म्हणाले 🪯 श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांचे साहिबजादे ज्यांनी देश व मानवतेच्या रक्षणासाठी आपले बलिदान (शहादत) दिले. त्यांच्या स्मरणार्थ आणि येणाऱ्या भावी पिढी समक्ष मानवता व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये दरवर्षी 25 आणि 26 डिसेंबर रोजी "साहिबजादे शहादत दिवस" समागम चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये दि. 25 डिसे…
🏆एमपीटी मुंबई आणी बीएसएफ जालंधर तिसऱ्या स्थानासाठी खेळणार🏆 ✍️वृत्त विशेष :- रविंद्रसिंघ मोदी नांदेड नांदेड (दि.26 डिसेम्बर) : श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आता पंजाब पोलीस संघ आणी ऑरेंज सीटी नागपुर संघात अंतिम सामना रंगणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता सुमारास दोन्ही संघा दरम्यान अंतिम सामना खेळला जाईल. तसेच तीसरे स्थान राखण्यासाठी बीएसएफ जालंधर आणी एमपीटी मुंबई यांच्यात भिडंत होईल. तिसऱ्या स्थाना करिता सकाळी 8 वाजता सामना सुरु होईल. आज उपांत्य फेरीत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांचे निकाल…
🌟यावेळी चर्चमध्ये क्रिसमस ट्री सजवण्यात आला होता आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती🌟 पुर्णा :- पुर्णा शहरातील मेथोडिस्ट चर्च मध्ये २५ डिसेंबर २०२५ रोजी नाताळ सणाच्या निमित्ताने विशेष प्रार्थना, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील या चर्च चे फादर .रेवरेंट संतोष सुर्यवंशी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिकवणीप्रमाणे शांती एकता अणि समानतेचा जीवन जगण्याचा संदेश दिला. चर्चमध्ये क्रिसमस ट्री सजवण्यात आला होता आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजबा…
🌟मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर सटवाजी बोकारे असून सदरील मयत युवक तालुक्यातील फुकटगाव येथील रहिवासी आहे🌟 पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील पूर्णा-ताडकळस महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून हा पुर्णा-ताडकळस मार्ग जणुकाही मृत्यूचा महामार्ग बनल्याचे निदर्शनास येत असून या मार्गावरील कानडखेड शिवारात बळीराजा साखर कारखान्यासमोर काल गुरूवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ०१.४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर सटवाजी…
🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे विविध शासकीय कामाचा शुभारंभ🌟 गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले हे भुमिपुजन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी करण्यात आले या भुमिपुजनात ग्रामपंचायत नवीन इमारतः ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी सुसज्ज अशी नवी वास्तू मिळणार आहे. तलाठी भवनः महसूल विभागाचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पांदण रस्ते (८ रस्ते): शेतकऱ्यांची शेतात जाण्याची…
🌟'परभणी जिल्हा अख्खा झटला पण् यशवंत सेनेचा ढाण्या वाघ मैदानातून यत्किंचितही नाही हटला'🌟 पुर्णा : - 'परभणी जिल्हा अख्खा झटला पण् यशवंत सेनेचा ढाण्या वाघ मैदानातून यत्किंचितही नाही हटला' यशवंत सेना शहर विकास आघाडीची स्थापना करुन गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड-पुर्णा शहरातील एकाधिकारशाहीला लगाम लावण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांनी नमूद दोन्ही नगर परिषदांमध्ये यशवंत सेना शहर विकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला गंगाखेड नगर परिषदेत यशवंत सेना शहर विकास आघाडीचे जवळ…
🏆नागपुर, दिल्ली,संभाजीनगर आणी पंजाब पोलीस संघ विजयी🏆 नांदेड :- श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली, संभाजीनगर, पंजाब पोलीस आणी नागपुरच्या दोन संघ विजयी ठरले. रविवारी सकाळी स्पर्धेचा पाचवा सामना ऑरेंज सिटी नागपुर आणी अश्विनी क्लब मैसूर यांच्यात खेळला गेला. नागपुर संघाने हा सामना 4 विरुद्ध 0 असा जिंकला. खेळाच्या 25 व्या मिनिटास नागपुरच्या श्रेयस धुपे याने पेनल्टी कार्नरच्या संधीचा लाभ घेत गोल नोंदवला. त्यानंतर त्याने 49 मिनिटाला मैदानी गोल करत संघास पुढे नेले. खेळाच्या 53 व्या मिनिटाला…
🌟हिंगोली येथील गोविंद नगर,अकोला बायपास येथे साकारण्यात आलेल्या तपस्या भवनचे २४ डिसेंबर रोजी उद्घाटन🌟 हिंगोली(२२) (वृत्त विशेष) सर्वे भवंतू सुखि:न संकल्पना अवघ्या विश्वात रुजवण्यासाठी सेवारत असलेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत हिंगोली येथे तपस्या भवन चे उदघाटन राजयोगिनी ब्र. कु.संतोष दीदी व नांदेड हिंगोली जिल्हा प्रभारी ब्र. कु.शिवकन्या बहेंनजी च्या हस्ते होणार असल्याची माहिती तपस्या भवन संचालिका ब्र.कु.अर्चना बहेंनजी ह्यांनी दिली . हिंगोली येथील गोविंद नगर,अकोला बायपास येथे तपस्या भ…
🌟जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची पत्रकार परिषदेत माहिती🌟 परभणी - परभणी शहर महानगरपालिका निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर पूर्ण ताकतीने लढवणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ज्या राजकीय पक्षांनी परभणी शहर महानगरपालिका लुटून खाल्ली तीच लोक फक्त पक्षाचं नाव बदलून आज विकासाच्या मुद्द्यावर परभणीच्या जनतेसमोर मत मागण्यासाठी येत आहेत. जिल्ह्यातील पुढाऱ्यांना मुलं, भाऊ, पत्नी या नातलगांना राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांना शहराच्या विकासात अजिब…
🌟नगराध्यक्ष पदावर यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ.विमलताई कदम ३३८ मतांनी विजयी🌟 🌟शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार सौ.प्रेमला संतोष एकलारे यांचा ३३८ मतांनी केला पराभव🌟 पुर्णा : - पुर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्ष पदासह एकूण तेवीस नगरसेवक पदांच्या निवडी संदर्भात आज दि.२१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी मतमोजणी प्रक्रियेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेना शहर विकास आघाडीने खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा,माजी आ…