🪯श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन मध्ये आयोजित सद्भावना सम्मेलनात बोलतांना ते म्हणाले 🪯
श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांचे साहिबजादे ज्यांनी देश व मानवतेच्या रक्षणासाठी आपले बलिदान (शहादत) दिले. त्यांच्या स्मरणार्थ आणि येणाऱ्या भावी पिढी समक्ष मानवता व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये दरवर्षी 25 आणि 26 डिसेंबर रोजी "साहिबजादे शहादत दिवस" समागम चे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये दि. 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री विशेष किर्तन दरबार, सद्भावना दौड मैराथन तसेच दि. 26 डिसेंबर 2025 रोजी शाळकरी विद्यार्थ्यांची सद्भावना रैली, दशमेश हॉस्पीटल मध्ये विविध मेडीकल कॅम्प चे आयोजन करण्यात आले तसेच श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन मध्ये डॉ.स. विजय सतबीर सिंघ जी यांच्या अध्यक्षते खाली सद्भावना सम्मेलन आयोजित करण्यात आले.
दि. 26 डिसेंबर 2025 च्या सद्भावना सम्मेलन मध्ये सकाळी 11:30 वाजता अरदास करुन विद्यार्थ्यांतर्फे शब्द गायन करुन आणि साहिबजादे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करुन व दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये स. गुरुबचन सिंघ जी प्राचार्य यांनी प्रस्तावना केली व साहिबजादे याच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच ग्यानी तनवीर सिंघ जी, प्रो. डॉ. परमिंदर कौर कोल्हापुर, ग्यानी सरबजीत सिंघ जी निर्मले, प्रो.डॉ. प्रकाश निहलानी व ग्यानी अवतार सिंघ जी शितल यांनी आपले मनोगत व्यक्त करुन साहिबजादे यांनी दिलेल्या लहान वयामध्ये शहादत व देश आणि मानवता रक्षणासाठी दिलेल्या बलिदाना बाबत इतिहास सर्वांसमक्ष प्रस्तुत केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - डॉ. विजय सतबीर सिंघ जी IAS (R) प्रशासक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना 7 व 9 वर्षाच्या साहिबजादे यांनी जसे मानवतेच्या रक्षणासाठी व तत्कालीन शासकांच्या विरोधात ज्यांनी प्रताडीत करुन जबरदस्ती ने धर्मपरिवर्तनासाठी दबाव झुगारुन कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नसून फक्त मानवतेच्या रक्षणासाठी व त्यांच्या तत्वांच्या विरोधात त्यांनी आपले बलिदान दिले. अशा महान साहिबजादे यांच्या बलिदानाची येणाऱ्या भावी पिढींनी प्रेरणा घेऊन मानवता, देश रक्षण व तत्वांसाठी लढा देऊन प्रेरणा घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर गुरुद्वारा बोर्डातर्फे आयोजित मैराथन व निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सम्मान राशी म्हणून पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. व आलेल्या सर्व मान्यवरांना सुध्दा श्रध्दा भेट म्हणून स्मृति चिन्ह देण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये साहिबजादे यांच्या स्मरणार्थ बोर्डातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सचखंड पत्र या अंकाचे विमोचन ही करण्यात आले.
यावेळी स. हरजीत सिंघ कडेवाले अधिक्षक, स. जसवंत सिंघ बॉबी सलाहकार, स. रविंदर सिंघ कपूर, स. जैमल सिंघ ढिल्लो, स. बलविंदर सिंघ फौजी सर्व सहा. अधिक्षक व स. गुरुवचन सिंघ प्रचार्य, स. चांद सिंघ मुख्याध्यापक, श्रीमती अनिल कौर - प्राचार्य, श्रीमती बबीता कौर चाहेल पी.ए. इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन - स. भिम सिंघ बेलथरवाले - निदेशक आणि आभार स. सतपाल सिंघ मास्टर खालसा हायस्कुल यांनी केले.......

0 टिप्पण्या