🌟'परभणी जिल्हा अख्खा झटला पण् यशवंत सेनेचा ढाण्या वाघ मैदानातून यत्किंचितही नाही हटला'🌟
पुर्णा :- 'परभणी जिल्हा अख्खा झटला पण् यशवंत सेनेचा ढाण्या वाघ मैदानातून यत्किंचितही नाही हटला' यशवंत सेना शहर विकास आघाडीची स्थापना करुन गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड-पुर्णा शहरातील एकाधिकारशाहीला लगाम लावण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरलेल्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांनी नमूद दोन्ही नगर परिषदांमध्ये यशवंत सेना शहर विकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला गंगाखेड नगर परिषदेत यशवंत सेना शहर विकास आघाडीचे जवळपास पंधरा नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवला तर संपूर्ण परभणी जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाची नगर परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा नगरपरिषद निवडणुकीत यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.विमलबाई लक्ष्मणराव कदम यांच्यासह ७ उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजय झाला.
या घवघवीत यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी यशवंत सेना शहर विकास आघाडीचे संयोजक तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांनी स्वतः पुर्णा शहरात उपस्थित राहून भव्य विजयी रॅलीचे आयोजन केले यावेळी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय, विजयी सर्व उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. तसेच त्यांनी सर्व मतदार, नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. सोबतच आपल्या सर्वांच्या साथीने पूर्णा शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही सगळे कटिबध्द आहोत अशी ग्वाही देखील आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका यांनी दिली.

यावेळी बोलतांना आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका म्हणाले की जनतेच्या प्रचंड विश्वासावर आणि भरभरून पाठिंब्यावर शिक्कामोर्तब करत आपल्या नगराध्यक्ष विमलबाई लक्ष्मणराव कदम आणि इतर ७ उमेदवारांनी अभूतपूर्व मतांनी अत्यंत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे हा केवळ आपल्या उमेदवारांचा विजय नसून, तो पूर्णा शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा, प्रामाणिक नेतृत्वाचा आणि विकासाभिमुख विचारांचा विजय आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि साथ या विजयाचे खरे बळ ठरले आहे.
या यशासाठी सर्व मतदार बांधवांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात प्रशासनात पारदर्शकता, नागरिकाभिमुख निर्णय आणि सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आपले नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक सदैव कटिबद्ध राहतील, याची खात्री आहे. म्हणून हा विजय जनतेचा आहे, असेही आवर्जून सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा विमलबाई लक्ष्मणराव कदम यांच्यासह सर्व विजयी उमेदवार तसेच यशवंत सेना व गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.........
0 टिप्पण्या