🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे विविध शासकीय कामाचा शुभारंभ🌟

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले हे भुमिपुजन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी करण्यात आले या भुमिपुजनात ग्रामपंचायत नवीन इमारतः ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी सुसज्ज अशी नवी वास्तू मिळणार आहे. तलाठी भवनः महसूल विभागाचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पांदण रस्ते (८ रस्ते): शेतकऱ्यांची शेतात जाण्याची अडचण दूर करण्यासाठी तब्बल ८ पांदण रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाला शब्द, 'शादीखाना' देणार ! कार्यक्रमादरम्यान धनगर टाकळी येथील मुस्लिम समाज बांधवांनी आपली अडचण मांडताना सांगितले की, गावात लग्नकार्यासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी 'शादीखाना' उपलब्ध नाही. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी "मी तुम्हाला शब्द देतो, गावात शादीखाना मी देणार," असे आश्वासन दिले. त्यांच्या या घोषणेमुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शनः यावेळी बोलताना आ.डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, "ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा मुख्य ध्यास आहे. धनगर टाकळी अ परिसरातील प्रत्येक समाजाला उत्तम सोयीसविधा मार्गदर्शनः यावेळी बोलताना आ. डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, "ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा मुख्य ध्यास आहे. धनगर टाकळी आणि परिसरातील प्रत्येक समाजाला उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन ग्रामपंचायत आणि तलाठी भवनामुळे शासकीय कामात पारदर्शकता येईल, तर पांदण रस्त्यांमुळे बळीराजाची मोठी सोय होईल." उपस्थितीः या सोहळ्यासाठी धनगर टाकळी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते......
0 टिप्पण्या