🪯श्री गुरु गोबिंदसिंघजी अ.भा.गोल्ड अँड सिल्वर कप स्पर्धेपंजाब पोलिस आणी ऑरेंज सीटी नागपुर खेळणार अंतिम सामना...!



🏆एमपीटी मुंबई आणी बीएसएफ जालंधर तिसऱ्या स्थानासाठी खेळणार🏆


✍️वृत्त विशेष :- रविंद्रसिंघ मोदी नांदेड 

नांदेड (दि.26 डिसेम्बर) : श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आता पंजाब पोलीस संघ आणी ऑरेंज सीटी नागपुर संघात अंतिम सामना रंगणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता सुमारास दोन्ही संघा दरम्यान अंतिम सामना खेळला जाईल. तसेच तीसरे स्थान राखण्यासाठी बीएसएफ जालंधर आणी एमपीटी मुंबई यांच्यात भिडंत होईल. तिसऱ्या स्थाना करिता सकाळी 8 वाजता सामना सुरु होईल. 


आज उपांत्य फेरीत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांचे निकाल शूटआउट (सडन डेथ) प्रणालीने काढण्यात आले.शुक्रवारी दुपारी एक वाजता पंजाब पोलीस आणी एमपीटी मुंबई संघा दरम्यान पहिला उपांत्य सामना खेळला गेला. हा सामना 1 विरुद्ध 1 गोलाने बरोबरीवर सूटल्यामुळे सामन्याचा निकाल टाईब्रेकर शूटआउट प्रणालीने लावण्यात आले. शूटआउट (सडन डेथ) मध्ये पंजाब संघाने 5 विरुद्ध 4 गोलाने सामना जिंकला आणी अंतिम सामन्यासाठी प्रवेश पक्का केला. वरील सामन्याचे अंतिम निकाल 6 गोल विरुद्ध 5 गोल असे गणले जाईल. 

आजचा उपांत्य फेरिचा दूसरा सामना दुपारी 3 वाजता दरम्यान खेळला गेला. वरील सामना बलाढ्य संघ बीएसएफ जालंधर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर यांच्यात खेळला गेला. अटितटीच्या या सामन्यात दोन्ही संघाकडून परस्परा विरोधात तीन विरुद्ध तीन गोल केल्याने हा सामना देखील बरोबरीवर संपला. ज्यामुळे टाईब्रेकर शूटआउट (सडन डेथ) प्रणाली द्वारे सामन्याचे निकाल घेण्यात आले. यात नागपुर संघाने 5 गोल केले तर बीएसएफ संघ 4 गोल करू शकला. या सामन्याचा निकाल 8 विरुद्ध 7 गोल असा गणला जाईल. उद्या होणारा अंतिम सामना खेळ प्रेक्षकांनी आवर्जूनपणे पाहावे असे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक सरदार गुरमीत सिंघ नवाब (डिंपल) आणी कमेटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे...........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या