🌟पुर्णेतील प्रभाग क्र.१० 'ब' चे यशवंत सेनेचे उमेदवार सुनील जाधव यांच्या प्रचारार्थ ॲड.सौ.रेखाताई रत्नाकर गुट्टे यांच प्रचार रॅली....!



🌟आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या सौभाग्यवती ॲड.सौ.रेखाताई गुट्टे यांनी मतदारांच्या घेतल्या डोअर टू डोअर भेटीगाठी 🌟 


पुर्णा
:- गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे काका यांच्या सौभाग्यवती ॲड.सौ.रेखाताई गुट्टे काल बुधवार दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्र.१० 'ब' चे यशवंत सेना शहर विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुनिल लक्ष्मण जाधव यांच्या प्रचारासाठी पूर्णेत आल्या होत्या.



यावेळी ॲड.सौ.रेखाताई रत्नाकर गुट्टे यांनी प्रभाग क्रमांक १० मधील मतदार जनतेच्या डोअर टू डोअर भेटीगाठी घेतल्या यावेळी प्रभागातील मतदार जनतेला त्यांना भरभरून प्रतिसाद दिला यावेळी डोअर टू डोअर प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला होता यावेळी प्रभाग क्रमांक १० 'ब'चे लोकप्रिय उमेदवार सुनिल लक्ष्मण जाधव सौ.अनिता सुनिल जाधव, प्रभाग क्रमांक ०४ च्या उमेदवार सौ.जोशना भिमराव वादळे,भिमराव वादळे,गौतम भोळे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या