पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील पूर्णा-ताडकळस महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून हा पुर्णा-ताडकळस मार्ग जणुकाही मृत्यूचा महामार्ग बनल्याचे निदर्शनास येत असून या मार्गावरील कानडखेड शिवारात बळीराजा साखर कारखान्यासमोर काल गुरूवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ०१.४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर सटवाजी बोकारे (वय ३९, रा. फुकटगाव, ता. पूर्णा) असे आहे. ज्ञानेश्वर बोकारे हे दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघात घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
मुत्यु पावलेला युवक ज्ञानेश्वर बोकारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फुकटगाव परिसरात शोककळा पसरली आहे. ते शेतीसह तहसील कार्यालयातील कामे करून उदरनिर्वाह करत होते.....

0 टिप्पण्या