🌟नगराध्यक्ष पदावर यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ.विमलताई कदम ३३८ मतांनी विजयी🌟
🌟शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार सौ.प्रेमला संतोष एकलारे यांचा ३३८ मतांनी केला पराभव🌟
पुर्णा :- पुर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्ष पदासह एकूण तेवीस नगरसेवक पदांच्या निवडी संदर्भात आज दि.२१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी मतमोजणी प्रक्रियेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेना शहर विकास आघाडीने खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा,माजी आमदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस तसेच पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला धोबीपछाड देत पुर्णा नगर परिषदेची सत्तासुत्र ताब्यात घेण्यात यश मिळवले असून यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.विमलताई लक्ष्मणराव कदम यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा उमेदवार सौ.प्रेमला संतोष एकलारे यांचा अटीतटीच्या लढतीत ३३८ मतांनी पराभव करीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवार सौ.विमलताई कदम यांना ६७७४ मते मिळाली तर शिवसेना उबाठा उमेदवार सौ.प्रेमला एकलारे यांना ६४५० मतें मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शेख हसीना बेगम शेख लतीफ यांना ५४८१ मत मिळाली या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार कमलबाई जनार्दन कापसे यांना केवळ १४३६ मत मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आम्रपाली केशव जोंधळे यांना २२५८ मत मिळाली.
पुर्णा नगर परिषदेच्या अकरा प्रभागातील तेवीस नगरसेवक पदांच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाकीर कुरेशी व अहमद जोहराबी गौस तर प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मीकांत कदम तर यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या उमेदवार मिरा विश्वनाथ होळकर तर प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना उबाठा उमेदवार रौफ कुरेशी व शिवसेना उबाठा उमेदवार राजनंदिनी दादाराव पंडित तर प्रभाग क्रमांक चार मधून शहर आघाडीचे उमेदवार उत्तम भैय्या खंदारे व जनाबाई ज्ञानोबा जोंधळे तर प्रभाग क्रमांक पाच मधून यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ.अर्चना मिलिंद कांबळे व यशवंत सेना शहर विकास आघाडीचे उमेदवार मोकिंद भोळे तर प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार वंदना सत्यभान कुलदिपके (रणवीर) व यशवंत सेना शहर विकास आघाडीकडून अब्दुल मुजीब अब्दुल हबीब तर प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.मिनाक्षीताई विजयकुमार कदम व यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या उमेदवार सौ.लक्ष्मीबाई विष्णुकांत भालेराव तर प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार भगवान सोळंके (भाजप) व सौ.पुजा सचिन कदम (शिवसेना) तर तीनचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार शमीम बेगम,पद्मीनबाई एंगडे व मोहंमद हाजी खलील कुरैशी तर प्रभाग क्रमांक दहा मधून यशवंत सेना शहर विकास आघाडीचे उमेदवार सुनील लक्ष्मण जाधव व सौ.कौशल्या मारोती भोसले तर प्रभाग क्रमांक अकरा मधून जनता दल (सेक्युलर) पक्षाचे उमेदवार सौ.रेखा अनिल खर्गखराटे व प्रकाश बन्शी कांबळे असे एकूण तेवीस नगरसेवक निवडून आले आहेत........
🌟आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केले पुर्णा नगराध्यक्ष सौ.विमलताई कदम यांच्यासह यशवंत सेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन :-


0 टिप्पण्या