🌟हिंगोली येथील गोविंद नगर,अकोला बायपास येथे साकारण्यात आलेल्या तपस्या भवनचे २४ डिसेंबर रोजी उद्घाटन🌟
हिंगोली(२२) (वृत्त विशेष)सर्वे भवंतू सुखि:न संकल्पना अवघ्या विश्वात रुजवण्यासाठी सेवारत असलेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत हिंगोली येथे तपस्या भवन चे उदघाटन राजयोगिनी ब्र. कु.संतोष दीदी व नांदेड हिंगोली जिल्हा प्रभारी ब्र. कु.शिवकन्या बहेंनजी च्या हस्ते होणार असल्याची माहिती तपस्या भवन संचालिका ब्र.कु.अर्चना बहेंनजी ह्यांनी दिली.
हिंगोली येथील गोविंद नगर,अकोला बायपास येथे तपस्या भवन साकारण्यात आले असून २४ डिसेंबर बुधवारी सकाळी ११ वाजता केल्या जाणार असून ११.३० ते १ आशीर्वाचन होणार असल्याचे ही अर्चना बहेन ह्यांनी सांगितले. तपस्या भवन च्या उदघाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर,आमदार तानाजीराव मुटकुळे,आमदार हेमंत पाटील शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तपस्या भवनाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात सर्वांना सत्यज्ञान,परंपिता परमात्मा कृपा प्राप्ती चा सन्मार्ग मिळवून जीवनानंद चा उपहार प्राप्त करण्यासाठी हे तपस्या केंद्र अविरत कार्य रत राहणार असल्याने सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा अस आवाहन नांदेड हिंगोली जिल्हा प्रभारी ब्र.कु.शिवकन्या बहेनजी ह्यांनी केले आहे.विशेष म्हणजे उद्घाटक म्हणून ब्रम्हकुमारीज च्या संयुक्त प्रशासिका व महाराष्ट्र आंध्र तेलंगणा व मुंबई च्या त्या क्षेत्रीय प्रभारी असून अश्या नावलौकिक बहेनजी च्या आशीर्वाचना चा लाभ घेण्यास उपरोक्त प्रदेशातून परिवारातील साधक येणार असल्याचे संचालिका टीअर्चना बहेनजी ह्यांनी सांगितले.
✍️ डॉ.विजय निलावार ज्येष्ठ पत्रकार हिंगोली🕉️शांती🕉️*



0 टिप्पण्या