🌟नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मिनाताई कदम,प्रेमलाताई एकलारे,अनिताताई जाधव,विमलताई कदम,शारजाबाई नारायनकर यांची जय्यत तयारी🌟
पुर्णा नगराध्यक्ष पदाच्या सन २०१६ यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उबाठा उमेदवार स्व.गंगाबाई सिताराम अप्पा एकलारे यांना सर्वाधिक ६९८० मत मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार शाहिस्ता बेगम कुरेशी यांना दुसऱ्या क्रमांकची ६७९७ मत मिळाली होती तर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ.अनिताताई सुनिल जाधव यांना या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकूण ४५०४ मत मिळाल्याने व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन शिवसेना उबाठा उमेदवार गंगाबाई सिताराम अप्पा एकलारे यांचा विजय झाला होता सतत पाच वर्ष यशस्वीपणे नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळेल्या तत्कालीन नगराध्यक्ष स्व.गंगाबाई सिताराम अप्पा एकलारे यांनी सर्व समाजांसह सर्वधर्मियांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणारे त्यांचे पुतणे माजी नगरसेवक संतोष एकलारे व तत्कालीन उपनगराध्यक्ष विशाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला पुर्णा शहरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुर्णाकृती पुतळ्यांची स्थापना तसेच पुर्णा नगर परिषदेच्या सुसज्ज अशा प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, छत्रपती संभाजी महाराज चौकातील भव्य असे छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम आदी महत्त्वाच्या कामांचे श्रेय तत्कालीन नगराध्यक्षा स्व.गंगाबाई एकलारे व नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा त्यांचे पुतणे मा.नगरसेवक संतोष एकलारे व तत्कालीन उपनगरात विशाल कदम यांनाच जाते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या संतोष एकलारे यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका सौ.प्रेमलाताई संतोष एकलारे निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर परिपक्व राजकीय वारसा लाभलेल्या कदम घराण्यातील तब्बल विस वर्ष नगराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे माजी नगराध्यक्ष जेष्ठ नेते उत्तमराव कदम यांच्या भाऊजयी तथा राजकीय क्षेत्रातील तरुण तडफदार धाडसी नेतृत्व माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम यांच्या मातोश्री सौ.मिनाताई विजयकुमार कदम या देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक मैदानात उतरण्याची शक्यता असून त्यांनी देखील जनसंपर्क वाढवण्यावर भर दिल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक/धार्मिक क्षेत्रात सदैव तन मन धनाने कार्यरत राहून सर्वधर्मिय समाजबांधव आदीवासी भटके विमुक्त मागासवर्गीय/इतर मागासवर्गीय गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणारे व्यक्तीमत्व म्हणून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे त्या सुनिल लक्ष्मण जाधव यांच्या सौभाग्यवती अनिताताई सुनिल जाधव या देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे समजते सौ.अनिताताई जाधव यांनी देखील जनसंपर्क वाढवण्यावर भर दिल्याचे निदर्शनास येत असून महिला वर्गात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे तर पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी यांच्या पत्नी शाहिस्ता बेगम जाकीर कुरेशी या देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता असून मागील सन २०१६ च्या नगराध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष स्व.गंगाबाई एकलारे यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले होते परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाल्याने त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती पुर्णा नगराध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुक मैदानात माजी शिवसेना शहरप्रमुख तथा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका कार्याध्यक्ष नितीन उर्फ बंटी कदम यांच्या मातोश्री सौ.विमलताई लक्ष्मणराव कदम या देखील उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून अत्यंत शांत संयमी स्वभावाच्या असलेल्या सौ.विमलताई कदम यांचा महिला मतदारांमध्ये अत्यंत दांडगा जनसंपर्क असून या निवडणुकीत त्यांची उमेदवारी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आव्हात्मक ठरणार आहे.
पुर्णा नगराध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्या उमेदवारांची देखील एन्ट्री होण्याची शक्यता असून शहरातील तरुणांचे आयकॉन व भ्रष्ट बेईमानशाहीचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व भ्रष्ट व बेईमानशाही कारभारावर वेळोवेळी अत्यंत परखड शब्दात आपली प्रतिक्रिया देऊन भ्रष्ट व बेईमानशाहांना धडकी भरवणारी सामाजिक क्षेत्रातील बुलंद तोफ समाजसेवक राजु नारायणकर यांच्या मातोश्री सौ.शारजाबाई विश्वनाथ नारायणकर या देखील पुर्णा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता असून त्यांनी देखील जनसंपर्क वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे तर एमआयएम पक्षात कार्यरत व अमान महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या शिरीन बेगम मोहम्मद शफीक या देखील आगामी पुर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिरीन बेगम मोहम्मद शफीक यांची मुस्लिम समाजासह इतर समाजात देखील चांगली प्रतिमा आहे एकंदर पुर्णा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक मैदानात अनेक तुल्यबळ उमेदवार उतरणार असल्याने यावेळी बहुरंगी लढत होण्याची शक्यता देखील राजकीय जानकारांतून व्यक्त होत आहे........


0 टिप्पण्या