🌟सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी केला जीवघेणा हल्ला : डोक्यात गंभीर दुखापत🌟
परभणी : परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या व मानवी आरोग्यास घातक असलेल्या अवैध गुटख्यासह तंबाखुजन्य पदार्थाची खुलेआम मोठ्या प्रमाणात होणारी विक्री व तस्करीसह कॉफी शॉपच्या नावावर चालणाऱ्या अनैतिक कारभारा विरोधात तसेच गोवंश व गोहत्या विरोधात मोठी चळवळ उभारणारे व अवैध वाळू तस्करी संदर्भात देखील सातत्याने संघर्ष करणारे परभणी येथील धाडसी व निर्भिड सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहराध्यक्ष अरुणभाऊ पवार यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी शहरातील धार रोडवर शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात पवार यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
परभणी शहरातील धाडसी व निर्भिड सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ पवार यांनी राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम होणारी विक्री व तस्करी विरोधात तसेच गोवंश गोहत्या विरोधातही त्यांनी रान पेटवले होते कदाचित याच धंद्यात कार्यरत समाजकंटकांनीच तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला नसेल ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटने संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार अरुण पवार हे दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शहरातील धार रोडवरुन आपल्या दुचाकीवरून जात असताना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जवळपास पाच ते सहा अज्ञात समाजकंटकांनी अरुण पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व डोक्यात गंभीर मारहाण करुन गंभीर जखमी केले रक्तबंबाळ अरुण पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुण घटनेतील आरोपीं विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे......


0 टिप्पण्या