🌟जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची पत्रकार परिषदेत माहिती🌟
परभणी - परभणी शहर महानगरपालिका निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर पूर्ण ताकतीने लढवणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ज्या राजकीय पक्षांनी परभणी शहर महानगरपालिका लुटून खाल्ली तीच लोक फक्त पक्षाचं नाव बदलून आज विकासाच्या मुद्द्यावर परभणीच्या जनतेसमोर मत मागण्यासाठी येत आहेत. जिल्ह्यातील पुढाऱ्यांना मुलं, भाऊ, पत्नी या नातलगांना राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांना शहराच्या विकासात अजिबात रस नाही. राजकारणी तेच आहेत त्यांचे कारनामे पण तेच आहेत फक्त पक्षाचे नाव बदलले आहे मनपाच्या सत्तेत सर्वच पक्ष आळीपाळीने राहिलेले आहेत अशा या राजकीय पक्षांवर परभणी शहरातील नागरिकांचा अजिबात विश्वास नाही. गुत्तेदारी करून महानगरपालिकेला आपली राजकीय दुकानदारी समजणाऱ्या लोकांची राजकीय दुकानदारी बंद करण्यासाठीच प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरला आहे. सध्या तरी आम्ही एकला चलो रे चा नारा दिलेला असला तरीही भविष्यामध्ये समविचारी पक्षांची साथ मिळाल्यास युती करण्यावर पक्षाचे प्रमुख मा. बच्चुभाऊ कडू निर्णय घेतील असेही शिवलिंग बोधने म्हणाले.सध्याच्या घडीला प्रहार जनशक्ती पक्षांनी परभणी शहर महानगरपालिकेच्या दहा जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली असून अनेक इच्छुक उमेदवारांशी चर्चा चालू असल्याने निवडणुकीत उमेदवारांचा आकडा पंचवीस पार करेल असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
परभणी शहरातील धार रोड वरील अनधिकृत कचरा डेपो प्रहार जनशक्ती पक्षाने राष्ट्रीय हरित लावाद न्यायालय कडे केस फाईल करून हटवला, वेळोवेळी मान्सूनपूर्व सफाई असेल, शहरातील आरोग्य व नागरी सुविधेचा प्रश्न असेल प्रहार जनशक्ती पक्षाने कुठलीही सत्ता नसताना केवळ आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनासनास मूलभूत सुविधा देण्यासाठी भाग पाडले.परभणी शहरातील हॉटेल सेफ्रोन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, प्रहार क्रांती दिव्यांग आंदोलन जिल्हाप्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, महिला आघाडी तालुकाप्रमुख सोनालीताई खिल्लारे, शहर प्रमुख सुषमाताई देशमुख आदींची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या