🌟अ.भा.श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांचा उपक्रम : पिंपळगाव लिखा,खुजडा,नऱ्हापूर,गोविंदपूरातील पुरग्रस्तांचा समावेश🌟
🌟माणूस नावाची एकच जात आणि माणुसकी नावाचा एकच धर्म परमपूज्य गुरुमाऊली यांची शिकवण🌟
पुर्णा :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने एक हाथ मदतीचा,मानव सेवा हिच ईश्वर सेवा या संकल्पनेतून पूर्णा तालुक्यातील गौर येथे पिंपळगाव लिखा, खुजडा, नऱ्हापूर, गोविंदपूर परिसरातिल एकूण 200 पूरग्रस्त बाधितांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप गुरुमाउलीचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांतदादासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले.
मागील काही दिवसापासून मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पीकांसहित मानवी जीवन धोक्यात आले होते. यां मानवी जीवनाला आधार मिळावा यां यासाठी २० टक्के अध्यात्म तर ८० टक्के समाजकारण या संकल्पनेचा अवलंब करत त्र्यंबकेश्वर गुरुपीठाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. याप्रसंगी मा. पंचायत समिती सदस्य श्रीधर पारवे,सरपंच चंद्रकांत सावळे, नितीन उर्फ बंटी कदम आदींसह श्री स्वामी समर्थ सेवेकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......
0 टिप्पण्या