🌟पुर्णा शहर शिवसेना (शिंदे) गटाचे शहराध्यक्ष गणेश कदम यांनी केला आ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश...!


🌟शिवसेना (शिंदे) गटाला हादरा : आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका यांनी गणेश कदम यांचे केले जोरदार स्वागत🌟


परभणी/पुर्णा
:- पुर्णा शहर शिवसेना (शिंदे) गटाचे पुर्णा शहराध्यक्ष गणेश नारायणराव कदम यांनी आज मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे.बनपिंपळा येथील आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या निवासस्थानी आ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गणेश कदम यांचे जल्लोषात स्वागत केले.

सविस्तर वृत्त असे की आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका यांचे खंदे समर्थक असलेल्या गणेश कदम यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक काळात आ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहिर प्रवेश केला होता शिवसेना (शिंदे) गटाकडून गणेश कदम यांना पुर्णा शहर प्रमुख म्हणून नुकतीच जवाबदारी देखील देण्यात आली होती परंतु आज मंगलवार दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश कदम यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक काळात आपल्या पदासह शिवसेना शिंदे गटाचा त्याग करुन आ.रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात जाहीर पुर्नप्रवेश केल्याने शिवसेना (शिंदे) पक्षाला चांगलाच हालरा बसल्याचे दिसत आहे.

यावेळी बोलतांना आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले की गणेश कदम हे सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारे युवक कार्यकर्ते आहेत पूर्णा शहरासह तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वात गुट्टे काका मित्र मंडळाचा विस्तार आणि संघटन मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास देखील आ.गुट्टे यांनी यावेळी व्यक्त केला या जाहीर प्रवेश प्रसंगी पूर्णा तालुका प्रभारी नितीन (बंटी) कदम,शहराध्यक्ष ॲड.राजेश देशमुख,प्रताप कदम,संतोष नाना सातपुते,विश्वनाथ होळकर यांच्यासह मित्र मंडळाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या