🌟शासनाने निष्पक्षपाती करवाई करावी व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील त्यांनी निवेदनाद्वारे केली🌟
नांदेड (दि.14 नोव्हेंबर) - नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उप शहर प्रमुख (दक्षिण नांदेड) जगदीप सिंघ नंबरदार यांनी राज्याच्या महसूल आणि वन विभागाच्या मुख्य सचिवांकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे की, नांदेड येथील जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब बोर्डाचे प्रशासक विजय सतबीर सिंघ यांनी गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956, महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि न्यायालयाच्या निर्णयांची पायमल्लीचे सत्र सुरु ठेवता गुरुद्वारा बोर्ड कार्यालयात फक्त 23 दिवसांसाठी कार्यरत असून तसेच सेवानिवृत्त अधीक्षक सरदार हरजीत सिंघ कडेवाले यांना 31 नोव्हेंबर रोजी एक महिन्यासाठी एक्सटेंशन दिले होते.
या सोबतच त्यांनी बोर्डाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या माजी अधीक्षक अधिकारी - ओएसडी राजदेवेन्द्र सिंघ कलहा, रविन्द्र सिंघ धुन्ने आणि शरण सिंघ सोढ़ी या सर्वांना कुठलीही विशेष योग्यता किंवा कारकिर्दी नसताना वेग वेगळ्या पदांवर नियुक्त केले आहेत. नंबरदार यांनी मागणी केली आहे की निवेदनात नमूद केलेले संबंधित न्यायालयीन निर्णय आणि इतर बाबींच्या आधारे मुख्य सचिवांनी कडेवाले यांचे एक्सटेंशन व इतर नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात व पारदर्शकतेने पूर्णकालिक अधीक्षक नियुक्त करण्यात यावे. तसेच प्रशासक विजय सतबीर सिंघ यांचे कायद्याविरुद्ध नेमलेले स्वीय सहायक जसवंत सिंह बॉबी (दिल्ली) अनाधिकृतपणे अधिकाऱ्यांचा बैठका घेऊन त्यांना आदेश निर्देश देत असल्यामुळे बोर्डाचे प्रशासन बिघडले आहे आणि गुरुद्वारा भागाचे वातावरण संतापले आहे, असले प्रकार लवकरात लवकर थांबवण्यात यावे.
जगदीप सिंघ नंबरदार यांच्या बरोबर बीरेन्द्र सिंघ बेदी, बक्शी सिंघ पुजारी, देवेन्द्र सिंघ महाजन, महेन्द्र सिंघ पैदल, दीपक सिंघ गल्लीवाले, जगजित सिंघ खालसा, भोला सिंघ गाडीवाले, जसपाल सिंघ लांगरी, दीपक सिंघ हजूरीया, कश्मीर सिंघ भट्टी यांनी या निवेदनावर हस्ताक्षर केलेले आहे. शासनाने निष्पक्षपाती करवाई करावी व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पुढे केली आहे.......
0 टिप्पण्या