🌟नांदेड शहरातील दशमेश नगर (बाफना) परिसरात पाण्याची तीव्र टंचाई......!


🌟महानगर पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे 200 एम.एम.डी.आय. लाईन टाकण्याची मागणी🌟

नांदेड :- नांदेड शहरातील दशमेश नगर,अर्तियां कॉम्प्लेक्स,कोडगे कॉम्प्लेक्स, रविकिरण बिल्डिंग, आनंद नगर गृहनिर्माण संस्था आणि जलाराम काटा परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे (मनपा) तीव्र तक्रार केली आहे. संपूर्ण परिसरात पाणी न आल्याने येथील रहिवाशांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत.

या समस्येबाबत स. रणजीत सिंघ अमरजीत सिंघ गिल (सदस्य - शिख समुदाय समन्वय समिती), जसवंत सिंघ कदम, मंगल सिंघ, बलदेव सिंघ खालसा, आणि गुरदीप सिंघ यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिनिधींनी मा. आयुक्त साहेब, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांना एक औपचारिक पत्र सादर केले आहे.

✍️पत्रातील प्रमुख मागण्या :-

• परिसरातील संपूर्ण पाइपलाईनची तपासणी करावी.

• जुनी/खराब झालेली पाइपलाईन बदलून तातडीने नवीन पाइपलाईन टाकावी.

• नियमित व पुरेसा पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा.

• या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा म्हणून 200 एम.एम. डी.आय. (DI) लाईन टाकण्याची विशेष मागणी करण्यात आली आहे.

निवेदकांनी मनपा आयुक्तांनी या गंभीर जनसमस्येची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नांदेड महानगर पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रावर स.रणजीत सिंघ अमरजीत सिंघ गिल (सदस्य - शिख समुदाय समन्वय समिती),जसवंत सिंघ कदम,मंगल सिंघ,बलदेव सिंघ खालसा,गुरदीप सिंघ आदींसह समस्त दशमेश नगर परिसरातील रहिवाश्याच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या