🌟बुद्ध धम्म विचार प्रणाली वर्तनात दिसली पाहिजे....!


🌟सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामचंद्र मोरे यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहारात  मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त दि.04 डिसेंबर 2025 रोजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश भदंत पयासा र यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामचंद्र मोरे व सेवानिवृत्त अभियंता सात करनी महाविहार लातूरचे विश्वस्त इंजिनीयर आर एस सोनकांबळे हे होते. 

प्रथमतः सकाळी 05.30 वाजता बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी त्रिशरण अष्टशील पूजा पाठ पूज्य भंते गणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळ व उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दुपारी 12.300वाजता बुद्ध विहारात सामूहिक वंदना व पूजा विधी संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारीरामचंद्र मोरे व सेवानिवृत्त इंजिनियर आर एस सोनकांबळे यांचा विहार समितीच्या वतीने शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह व लिंबूनी स्मरणिका देऊन यथोची सत्कार करण्यात आला. 

यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतामध्ये मार्गशीष पौर्णिमेचे महत्त्व विशद करताना रामचंद्र मोरे यांनी बुद्ध धम्म विचार प्रणाली जगामध्ये श्रेष्ठ आहे प्रत्येकाच्या आचरणाचा भाग ती बनली पाहिजे यासाठी आपणाला आदर्श बौद्ध उपासक उपासिका होणे गरजेचे आहे इंजिनीयर आर.एस. सोनकांबळे यांनी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्मच का स्वीकारला व आपल्या पाच लाख अनुयायांना का दिला याविषयी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली जगामधल्या प्रत्येक धर्माचा काळजीपूर्वक अभ्यास त्यांनी केला होता व गहन विचारांती त्यांनी बुद्ध धम्माची निवड केली संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचे विचार मोठ्या संख्येने आचरणात आणले जात आहेत. 

आपल्या प्रदीर्घ धम्मदेशेमध्ये भदंत पयावंश यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व समर्पक शब्दामध्ये विशद केले या पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध राजगृहाला गेले तत्कालीन महानराजे बिंबिसार यांनी यथोचित स्वागत करून भिकू संघाला भोजनदान दिले तथागत भगवान बुद्धांची धम्मदेशना ग्रहण केल्यानंतर त्यांनी विस्तीर्ण असे वेलुवण दान केले दानपरामीता शील सदाचरण बुद्ध धम्माचा मूलाधार आहे असे आपल्या धम्मदेशनेमध्ये त्यांनी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे , नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे, माजी नगरसेवक एडवोकेट धम्मदीप जोंधळे, माजी नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड , महाराष्ट्र पोलीस व श्रद्धा संपन्न उपासक मिलिंद कांबळे, उद्योजक गौतम भोळे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे, राहुल धबाले विशाल कांबळे मुकुंद भोळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे अमृतराव मोरे शामराव जोगदंड टी झेड कांबळे वा.रा. काळे शिवाजी थोरात मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंधळे आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी उपासिका मैत्री मोरे उपासिका मु दी ता मोरे यांच्याकडून भिकू संघास ची वरदान करण्यात आले. कार्यक्रमानंतर बालक विधान परेश मोरे ह्याच्या जन्मदिनानिमित्त कुटुंबियाकडून उपस्थितांना खीर दान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू जोंधळे राम भालेराव प्रवीण कनकुटे सुरज जोंधळे बाळू बरबडीकर आदीसह बुद्ध विहार समिती व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या