🌟वृत्तस्थ पत्रकारितेचा दीपस्तंभ जेष्ठ पत्रकार विजय बगाटे....!



🌟थोर महापुरुष समाज सुधारक परिवर्तनवादी संत यांच्या विचाराचे प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेमध्ये प्रकर्षाने जाणवते🌟

पुर्णा :- पुर्णा शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श सेवानिवृत्त शिक्षक विजयजी बगाटे यांचं पत्रकारितेतील आंबेडकरी व धम्म चळवळीतील प्रबोधन परिवर्तन चळवळीतील समर्पित योगदान काळाच्या कसोटीला उतरलेलं आहे पत्रकारितेतील त्यांचे सर्वोच्च आदर्श विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता समाजातील उपेक्षित शोषित पिडीत अन्यायग्रस्त समाजाविषयी असलेली कणव थोर महापुरुष समाज सुधारक परिवर्तनवादी संत यांच्या विचाराचे प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेमध्ये प्रकर्षाने जाणवते. 

गेली साडेतीन दशकापेक्षाही जास्त विविध वर्तमानपत्रामधून न त्यांचं लेखन सातत्याने सुरू आहे महाराष्ट्रातील आघाडीचे वर्तमानपत्र दैनिक लोकमत मध्ये तीन दशक त्यांनी पूर्णा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्य केले पूर्णा शहरातील परभणी जिल्ह्यातील जनतेचे न्याय प्रश्न आपल्या लेखणीतून ऐरणीवर आणले. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले अधिकारी पदाधिकारी उच्च पदस्थाधिकारी यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल जनतेचे न्याय प्रश्न कसे सुटतील यासाठी त्यांचे नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील. 

पूर्णा शहरामध्ये तालुक्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी महापुरुष समाज सुधारकांचा विचार जन माणसांमध्ये तरुणांमध्ये रुजावा यासाठी समविचारी मित्रांना सोबत घेऊन प्रबोधन अकादमी ची स्थापना करण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या