🌟प्रहार जनशक्ती पक्षाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार🌟
परभणी - महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेली मतदारांची प्रारुप यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ घालण्यात आलेला आहे. प्रभाग क्र. १५ ची प्रभाग रचनेची अधिसुचना दि.०३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली यात प्रभाग क्रमांक १५ ची जी व्याप्ती देण्यात आली होती त्या मध्ये वांगी रोड झोपडपट्टी, स्वच्छता कॉलनी या भागाचा समावेश नव्हता. परंतु दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या मुळ प्रारुप यादीमध्ये वांगी रोड, झोपडपट्टी, स्वच्छता कॉलनी या भागाचा समावेश करण्यात आला हे कुणाच्या सांगण्याने करण्यात आले याची चौकशी करून हा भाग तात्काळ संभाव्य अंतिम यादीमधून वगळण्यात यावा. त्याशिवाय मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावे अशी आहेत ज्यामध्ये मतदाराचे नाव नाही फक्त वडिलांचे / पतीचे नाव आहे व आडनाव आहे. तसेच काही मतदारांचे फक्त आडनावच आहे. तर काही मतदारांच्या वडिलांचे पतीचे नावच गायब आहे. हे सर्व मतदार बोगस असण्याची दाट शक्यता आहे.


0 टिप्पण्या